पुण्यात गिलियन बॅरे सिंड्रोमच्या रूग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ

73 जणांना बाधा तर 14 जण वेंटिलेटरवर

पुणे : आजकाल अशा आजारांचा धोका वाढत आहे ज्यांचे नाव सामान्य लोकांनीही ऐकले नसेल. महाराष्ट्रातील प्रमुख शहर पुणे येथे गिलियन बॅरे सिंड्रोम ज्याला काही ठिकाणी गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) असेही म्हटलं जात आहे, या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे सहा नवीन संशयित रुग्ण आढळले आहेत. या प्रदेशातील एकूण रुग्णांची संख्या आता ७३ वर पोहोचली असून सध्या या रोगाने पुण्यात हाहाःकार माजवला असल्याचे दिसून येत आहे. 

इतकंच नाही तर का पर्यंत वेंटिलेटवर असणाऱ्या रुग्णांची संख्या १२ होती जी आज १४ वर पोहचली असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

“जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या ७३ झाली आहे, ज्यामध्ये ४७ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश आहे. यापैकी १४ जण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत,” असे वृत्तसंस्था पीटीआयने राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले आहे. दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला २४ संशयित रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याची चौकशी करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले ​​आहेत आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) स्थापन केली आहे, जेणेकरून या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवता येईल. 


जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोम ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती परिधीय मज्जासंस्थेच्या एका भागावर हल्ला करते. या सिंड्रोममध्ये, स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या आणि वेदना, तापमान आणि स्पर्श संवेदना वाहणाऱ्या नसा प्रभावित होतात, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, पाय आणि/किंवा हातांमध्ये संवेदना कमी होतात आणि गिळताना किंवा श्वास घेण्यास त्रास होतो


ही एक दुर्मिळ स्थिती आहे आणि जरी ती प्रौढ आणि पुरुषांमध्ये अधिक सामान्य असली तरी, सर्व वयोगटातील लोकांना याचा त्रास होऊ शकतो. अधिकाऱ्यांनी जनतेला माहिती दिली आहे की गुइलेन-बॅरे सिंड्रोम धोकादायक आहे, परंतु त्यामुळे महामारी किंवा जागतिक साथीचा रोग होऊ शकत नाही. हा आजार वेळीच उपाय करून बरा करता येतो. मात्र त्यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे आणि योग्य ती यंत्रणा असणेही गरजेचे आहे 


महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाची रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) पुणे महानगरपालिका आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने बाधित भागांवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी आतापर्यंत शहर आणि त्याच्या ग्रामीण जिल्ह्यांमधील ७,२०० हून अधिक घरांचे सर्वेक्षण केले आहे. पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका आणि ग्रामीण जिल्ह्यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सर्वेक्षणाचे प्रयत्न केले गेले आहेत. आतापर्यंत, पीएमसी हद्दीतील १,९४३ घरे, चिंचवडमधील १,७५० घरे आणि ग्रामीण भागातील ३,५२२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.


तुम्ही चिकन वा मटण खात असाल तर ते संपूर्ण शिजवून खाणे गरजेचे आहे. कारण चिकन – मटण योग्य पद्धतीने शिजले नसेल तर शौचातून हा आजार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या पुण्यातील लोकांनी चिकन आणि मटण खाणे वर्ज्य करणे अधिक हिताचे ठरू शकते. तसंच हातापायाला मुंग्या येणे, पोटातून कळ येऊन उलट्या वा जुलाब होणे आणि मळमळसारखे वाटणे अशी लक्षणं दिसत असतील असतील तर त्वरीत डॉक्टरांना भेट द्या. 

मागील बातमी
वक्फ दुरुस्ती विधेयकावरून विरोधकांमध्ये खडाजंगी होऊन प्रचंड गोंधळ
पुढील बातमी
सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनातील सर्व खाते प्रमुख यांना सोबत घेऊन जिल्हा विकासाचे रोल मॉडेल बनवू : जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या