सातारा : एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने दि. 12 रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे करीत आहेत.