सातारा : शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील एका घरात चोरीची घटना घडून जवळपास ४८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने पळविल्याची नोंद झाली आहे.
चोरट्याने घरातील कपाटातून मंगळसूत्र आणि सोन्याचे झुमके असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.