सातारा : सातारा बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने दागिन्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एसटी स्टॅन्ड येथुन अज्ञात चोरट्याने 25 हजार रुपये किंमतीची सोन्याची ठुशी पर्समधून चोरुन नेली. ही घटना दि. 8 जून रोजी घडली आहे. याप्रकरणी प्रिता चंद्रकांत चरणकर (वय 50, रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.