सातार्‍यात शिवराज पेट्रोल पंपापासून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर होमगार्डवर हल्ला; चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 May 2026


सातारा : साताऱ्यात होमगार्ड जवानावर चार अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, होमगार्ड ओमकार नंदकुमार शिंदे (वय २५, रा. अमरलक्ष्मी, ता. जि. सातारा) हे १८ मे रोजी ड्युटी संपवून रात्री ८ वाजता महाबळेश्वरहून सातार्‍यात आले. ते घरी जात असताना रात्री सुमारे ९.३० वाजता शिवराज पेट्रोल पंपापासून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्याजवळ चार अनोळखी इसमांनी त्यांच्या दुचाकीसमोर स्वतःची गाडी आडवी घातली.

कोणतेही कारण नसताना संबंधितांनी बोथट तलवारीने शिंदे यांच्यावर वार केले. तलवारीला धार नसल्याने डाव्या हाताला मुक्कामार लागला, तर डाव्या मांडीवर दुसरा वार झाल्याने मांडीला खरचटून रक्तस्राव झाला.हल्लेखोर त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी होमगार्ड ओमकार शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात इसमांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटोळे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वधू-वर प्रवेश सोहळ्यात व्यस्त असताना धुळदेवमध्ये घरफोडी; १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास
पुढील बातमी
लग्नास नकार दिल्याच्या रागातून साताऱ्यात तरुणीवर सत्तूरने हल्ला करणाऱ्यावर गुन्हा

संबंधित बातम्या