माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालवल्याने लीलावती रुग्णालयात दाखल

by Team Satara Today | published on : 26 August 2024


पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बाबा सिद्दीकी यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून ते लीलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत. फूड पॉइजनिंग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बाबा सिद्दिकी यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची ‘जनसन्मान यात्रा’ सध्या सुरू आहे. ही ‘जनसन्मान यात्रा’ 20 ऑगस्टला मुंबईत होती. यावेळी बाबा सिद्दिकी हे त्या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लीलावती  रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ‘जनसन्मान यात्रे’त बाबा सिद्दीकी सहभागी झाले होते. यावेळी त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी देखील या यात्रेत सहभागी झाले होते. महिलावर्ग मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी झाला होता. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची तब्येत खालावली. विषबाधा झाल्याने बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बाबा सिद्दीकी हे मुंबईतील राजकीय वर्तुळातील मोठं नाव आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. 1999 साली ते पहिल्यांदा वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर 2014 पर्यंत ते सलग या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. आघाडी सरकारमध्ये ते मंत्री देखील राहिले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाकिस्तानच्या बलूचिस्तानात ट्रक आणि बसमधून लोकांना उतरवून त्यांच्यावर बेछूट केला गोळीबार 
पुढील बातमी
करिअरवर लक्ष केंद्रीत करताना कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले : अभिनेता आमिर खान

संबंधित बातम्या