अवैधरित्या दारूची वाहतूक प्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 24 May 2025


सातारा : अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गणेश बाळकृष्ण सावंत रा. लिंब फाटा, ता. सातारा हे बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा परिसरात अवैधरित्या दारूची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून 1750 रुपये किंमतीची देशी दारू आणि 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण 61 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
झेडपीचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे यांचे निधन
पुढील बातमी
गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या