राखी स्टॉलमुळे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा; तिघांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 25 August 2026


सातारा : शाहूपुरीतील पंजाब नॅशनल बँकेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर विनापरवानगी राखीचे स्टॉल लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय अंकुश घोरपडे, आकाश मच्छिंद्र गायकवाड आणि संतोष सदाशिव पवार यांनी रस्त्यावर राखी स्टॉल उभारल्याचे पोलिसांनी सांगितले. अडथळा दूर करण्यास सांगूनही संबंधितांनी नकार देत गोंधळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात कारवाई करण्यात आली असून, संबंधित प्रकरणांचा तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नगरपरिषदेच्या जिन्यात पोलिसांसमोरच राडा; दोन व्यक्तींमध्ये हाणामारी झाल्याने खळबळ
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या एकास दहा वर्षे सक्तमजुरी

संबंधित बातम्या