बेकायदेशीर बॅनर लावल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 03 April 2025


सातारा : कोडोली येथे यात्रेनिमित्त बेकायदेशीर रावण साम्राज्य या नावाने बॅनर लावल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिकेत राजेंद्र जाधव (वय 26, रा. कोडोली), ओंकार जयवंत गवळी (वय 20, रा. कोडोली), ओंकार अशोक जाधव (वय 29, रा. कोडोली), शिवानंद उमेश गुरव (वय 20, रा. कोडोली), आदित्य सागर जाधव (वय 24, रा.कोंडवे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई दि. 2 एप्रिल रोजी करण्यात आली आहे. पोलीस हवालदार जयवंत गोसावी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयितांनी बॅनरवर नाम तो सुनाही होगा रावण साम्राज्य’, असा मजकूर लिहला होता. संबंधित बॅनरची परवानगी नसल्याचे समोर आल्याने पोलिसांनी संबंधित पाचजणांवर गुन्हा दाखल केला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुका पोलिसांची दमदार कारवाई
पुढील बातमी
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या