शाहूपुरी येथे घरफोडी, 70 हजाराचा मुद्देमाल लंपास

by Team Satara Today | published on : 31 August 2024


सातारा : शाहूपुरी, सातारा येथील निसर्ग बंगल्याच्या दरवाजाचा कडी कोयडा तोडून अज्ञाताने आत प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार दि. 20 रोजीच्या मध्यरात्री अज्ञाताने निसर्ग बंगल्याच्या दरवाजाची कडी कोयडा काढून आत प्रवेश केला. यावेळी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याची कानातील फुले, चैन, नथ, चांदीची जोडवी, पट्टी जोड, कंबर पट्टा, अंगठी, चांदीच्या राख्या, चलनी नोटा, नाणी, रोख रक्कम असा 70 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी देण्यात आलेल्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक साबळे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढे फाटा परिसरात गायींची वाहतूक करणार्‍या ट्रकची तोडफोड, परिसरात तणावाचे वातावरण
पुढील बातमी
कॉपर वायरची चोरी

संबंधित बातम्या