उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गुरुवारी कराडमध्ये ; यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी करणार अभिवादन

by Team Satara Today | published on : 11 March 2026


सातारा : गुरुवार, दि. 12 रोजी स्व. यशवंतराव चव्हाण यांची 113 वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने कराडमध्ये विविध कार्यक्रम होणार आहे. दिवंगत नेते अजितदादा पवार हे जयंतीदिनी नेहमी उपस्थित राहून अभिवादन करत असत. त्यांचा वारसा जपत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या देखील कराड दौऱ्यावर येत आहेत.

सकाळी 9 वाजता कराडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आगमन होणार होणार असून यावेळी प्रीतीसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी त्या नतमस्तक होणार आहेत. तासभराच्या कार्यक्रमानंतर त्या पुण्याकडे रवाना होणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेही उपस्थित राहून स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लिंबखिंडीत झळकला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रस्तावित माहिती तंत्रज्ञान उद्यानाचा फलक

संबंधित बातम्या