रक्षक प्रतिष्ठानच्या निवडी जाहीर

by Team Satara Today | published on : 16 July 2025


सातारा : सातारा जिल्ह्याच्या समाजकारणात वेगळा चेहरा असणाऱ्या रक्षक प्रतिष्ठानच्या निवडी बुधवारी जाहीर करण्यात आल्या. सातारा जिल्हा, कराड, पाटण, कोरेगाव याची जबाबदारी मनोज माळी यांच्यावर, तर वाई, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा ची जबाबदारी दस्तगीर बागवान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्याची कमान विशाल पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नेमणूक पत्र देण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी भारतातच नव्हे तर आखाती देशांमध्ये सुद्धा आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

सुशील मोझर यांनी रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक कार्याची जाळे उभे केले आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आल्या. संघटनेची व्यापक बांधणी तसेच नवीन सभासद तयार करणे या दृष्टीने काही जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. यामध्ये मनोज माळी व दस्तगीर बागवान यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना सक्रिय राहणार असून संघटनेची व्यापकता वाढवण्याच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात संघटना सक्रिय राहणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी सांगितले आहे. सांगली जिल्ह्यातही नूतन कार्यकारणी निवडली जाणार असून सध्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी विशाल पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तर्कतीर्थांचे विचार मानवता धर्माची शिकवण देणारे : डॉ. अशोक जोशी
पुढील बातमी
सातारा तालुक्यात 36 टक्के पेरणी पूर्ण

संबंधित बातम्या