सातारा : सैदापूर येथे अज्ञात चोरट्यांनी 37 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर ता.सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन रोख 30 हजार रुपये व चांदीचा ऐवज असा एकूण 37 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना दि. 10 डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी राजाराम काशिनाथ तारळेकर (वय 64, रा. सैदापूर ता.सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.