सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर-पुणे महामार्गावर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एकजण पायी चालत महामार्ग ओलांडत असताना ट्रक क्र. एमएच 43 बीपी 4466 वरील चालक ज्ञानेश्वर राजेंद्र बडदे रा. कोडीत, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्या ट्रकने धडक दिल्याने संबंधित इसमाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 02 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026