अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णयः व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण

by Team Satara Today | published on : 04 October 2025


सातारा : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेव पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महामंडळ आता केवळ बैंक कर्जावरील व्याज परतावा योजनाच नाही, तर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व मार्गदर्शन देखील देणार आहे. हा निर्णय तरुण उद्योजकांना केवळ आर्थिक मदत न देता, त्यांना व्यवसाय यशस्वीपणे बालवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली.

यानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने त्वरीत कार्यवाही सुरु करुन, उद्योग-सारथी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दिनांक २४ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन वैबिनारचे आयोजन करण्यात आले हाते. ज्यामध्ये राज्यभरातील इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेविनारमध्ये "पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय" या महत्त्वपूर्ण विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले. हे वेबिनार युट्युब समवेत फेसबुकवर देखील Live स्वरुपात दाखविण्यात आले होते. यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी या प्रशिक्षणात डॉ. माने यांनी दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबींवर प्रकाश टाकला, ज्यामुळे नवीन आणि इच्छुक उद्योजकांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

उत्तम जातीच्या जनावरांची निवड दुग्धव्यवसायासाठी अधिक दूध देणाऱ्या जातीच्या गाई-म्हशींची निवड कशी करावी, याचे मार्गदर्शन डॉ. माने यांनी केले. यामध्ये गीर, साहिवाल, जर्सी यांसारख्या देशी आणि विदेशी जातींची माहिती दिली. आहाराचे महत्त्व जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य आहार कसा असावा, यावर त्यांनी भर दिला. संतुलित आहार, हिरवा आणि सुका चारा, तसेच आवश्यक खनिज मिश्रणे यांचे महत्त्व सांगितले. आरोग्याची काळजी जनावरांना होणारे आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल सखोल माहिती दिली. वेळोवेळी लसीकरण करणे, स्वच्छतेचे नियम पाळणे आणि आजार झाल्यास त्वरित उपचार करणे यावर मार्गदर्शन केले, आर्थिक नियोजनः दुग्धव्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक भांडवल, शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, तसेच दुधाची विक्री आणि मार्केटिंग याबद्दलही त्यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले. नवीन तंत्रज्ञान दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि व्यवस्थापन सोपे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली, या वेबिनारमुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदतीशिवाय, व्यवसायासाठी आवश्यक तांत्रिक आणि व्यवस्थापकीय ज्ञानही मिळाले. डॉ. माने यांचे मार्गदर्शन हे त्यांच्या व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीस नक्कीच उपयुक्त ठरेल,

डॉ. माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, "दुग्ध व्यवसाय हा केवळ उत्पन्नाचा स्रोत नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा एक महत्त्वाचा घटक आहे. योग्य प्रशिक्षण, नियोजन आणि शाश्वत व्यवस्थापन यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो."

राज्यभरातून अनेक युवक, महिला उद्योजिका व स्वयंसहायता गटांचे प्रतिनिधी या वेबिनारला ऑनलाईन उपस्थित होते. वेबिनार दरम्यान लाभार्थ्यांनी आपल्या शंका उपस्थित करून थेट डॉ. गाने यांच्याकडून उत्तरं मिळवली. पार पडलेल्या वेवीनारमधील सविस्तर माहिती महामंडळाच्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे.

महामंडळाकडून पुढील दिवसांत विविध जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन तज्ञ लोकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे महामंडळाच्या माध्यमातून तयार झालेल्या उद्योजकांच्या व्यवसाय वाढीस होणार असल्याचे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री देशमुख यांनी व्यक्त केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पतीने ४ महिन्यांच्या बाळाला बॅरलमध्ये बुडवले; स्वतःही जीवन संपवले
पुढील बातमी
बेकायदा होर्डिंग्ज दिसल्यास अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी

संबंधित बातम्या