सातारा : सातारा शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मॅरेथॉन बैठका होऊन सुद्धा नगराध्यक्ष खासदार गटाचा की मंत्री गटाचा यावरून नगराध्यक्ष पदाचा पेज कायम राहिला, मात्र दोन्ही राज्यांनी समन्वयाने 50 उमेदवारांची यादी अंतिम केली आणि संबंधित उमेदवारांना एबी फॉर्मचे निरोप रवाना झाले आहेत.
रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीमध्ये काही निवडक नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सहमतीने अंतिम केली जाणार असल्याची चिन्हे आहेत याचे निरोप अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवार, दि. 17 रोजी करणार असल्याची माहिती आहे.
खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्ष निकष आणि आरक्षण तसेच इलेक्टिव्ह मेरिट या तिन्ही निकषांना सांभाळताना प्रचंड कसरत करावी लागली. तसेच नागरिकांच्या पसंतीचे उमेदवार देताना बराच काथ्याकूट करावा लागला. रविवारी साताऱ्यात दुपारी आणि रात्री उशिरा तीन तीन तासाच्या दोन मॅरेथॉन बैठका पूर्ण झाल्या. या बैठकांना दोन्ही आघाड्यांचे पक्षप्रत्व लोकसभा संयोजक विधानसभा संयोजक तसेच काही मान्यवर नगरसेवक उपस्थित होते. ठिकाणाबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती. कोणालाही माहिती दिली जात नव्हती. रात्री उशिरा 90 टक्के यादी अंतिम करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. ज्यांची नावे अंतिम झाली त्यांचे एबी फॉर्मचे निरोप परवाना झाले असून तयारीला लागा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत बहुतांश नगरसेवकांनी ऑनलाइन अर्ज भरून प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी एबी फॉर्म सोमवारी सकाळी मिळेल याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नगराध्यक्षपदाचा अजूनही गुंता सुटलेला नाही खासदार गटाचा की आमदार गटाचा हा पेज मात्र भयंकर ताणला गेला आहे. कदाचित म्हणून मनोमिलनाची या मुद्द्यावरून पुन्हा सत्वपरीक्षा होऊ शकते अशा चर्चांना पुन्हा एकदा साताऱ्यात सुरुवात झाली होती. काही राजकीय जाणकारांच्या मते सोमवारी सकाळी प्रत्यक्ष अर्ज सादर करतानाच नगराध्यक्षपदाचा उमेदवार समोर येईल असा अंदाज आहे. दोन्ही नेते उमेदवारांचे अर्ज दाखल करताना सातारा नगरपालिकेत आपली उपस्थिती नोंदवणार असल्याची माहिती आहे.