जिहे परिसरात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; कोरेगावच्या एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 25 March 2026


सातारा  : सातारा रहिमतपूर रस्त्यावर असलेल्या जिहे गावच्या हद्दीत निलगिरीच्या बागेत असलेल्या नेटच्या शेडच्या आडोशाला तालुका पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून ९४० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी स्वप्निल प्रदीप सवने (वय ३३ रा. शांतीनगर कोरेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राहुल राऊत करत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुविधा उपलब्ध करण्याबाबत पालिकेस निवेदन
पुढील बातमी
किरकोळ वादाचा राग मनात धरून खेड येथून विवाहित महिला बेपत्ता

संबंधित बातम्या