सातारा : निष्काळजीपणे दुचाकी चालवून गंभीर अपघातात वृद्ध महिलेला जखमी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यावर अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अभय साहेबराव नलवडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद अशी की फिर्यादी त्यांच्या आईला दुचाकीवरून घेऊन जुना आरटीओ चौकाकडून हुतात्मा उद्यान चौकाकडे निघाले होते. सर्कल जवळ क्रॉस करण्यासाठी थांबले असताना एसटी स्टँड च्या रस्त्याकडील बाजूने टीव्हीएस आपाचे या गाडीवरून अज्ञात व्यक्तीने दुचाकी जोरदार चालवून फिर्यादीच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे फिर्यादीच्या आई पुष्पा साहेबराव नलवडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तसेच फिर्यादीच्या डाव्या पायाला सुद्धा मुका मार लागून गाडीचेही नुकसान झाले आहे. पोलीस हवालदार भोसले अधिक तपास करत आहेत.
अपघातात महिलेला जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 12 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा