सैदापूर येथे डंपरच्या धडकेमध्ये निवृत्त शिक्षकाचा मृत्यू

पत्नी गंभीर जखमी ; डंपर चालकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 24 December 2025


सातारा :  सैदापूर, ता. कराड येथे भरधाव डंपरने दुचाकी ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात निवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला तर या घटनेत त्या शिक्षकाची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी डंपर चालक शशिकांत शिवाजी फल्ले, रा. वाघेरी, ता. कराड याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, आज सकाळी बाबासाहेब शामराव तपासे, वय ६३, रा. रविवार पेठ, कराड हे पत्नी श्रीमंतिनी तपासे यांच्यासह दुचाकीवरून ओगलेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी निघाले होते. दुचाकी सैदापूर येथील लक्ष्मी गार्डन हॉटेल समोर येताच पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरणे दुजाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाबासाहेब तपासे यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा कृषी महोत्सवाचे कराड येथे 26 ते 30 डिसेंबर कालावधीत आयोजन : प्रकल्प संचालक अजय शेंडे यांची माहिती

संबंधित बातम्या