तब्बल २३० किलो वाढलेलं वजन, डॉक्टरांनी सोडलेली आशा

प्रसिद्ध बॉलिवूड सिंगरने सांगितलं ट्रान्सफॉर्मेशनचं सत्य

प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अदनान सामीने त्याच्या सुरेल गायनाने प्रेक्षकांच्या मनाला मोहिनी घातली आहे. मुळचा पाकिस्तानचा असलेला अदानान सामी आता भारताचा नागिरक झाला आहे. आपल्या आजवरच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीत गायकाने बरीच सुपरहिट गाणी गायली आहेत. परंतु सध्या अदनान सामी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अदनानने त्याचं २३० किलो वाढलेलं वजन कसं कमी केलं? याबद्दल खुलासा केला आहे.

नुकतीच अदनान सामीने 'ह्युमनस् ऑफ बॉम्बे'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सांगितलं आहे. त्यावेळी तो म्हणाला, २००६ मध्ये मला डॉक्टरांनी एक स्पष्टपणे सांगितलं होतं की माझ्याकडे फक्त ६ महिने शिल्लक आहेत. त्याचं कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन होतं. जवळपास २३० किलो माझं वजन वाढलं होतं. 

पुढे त्याने सांगितलं की, "डॉक्टर तेव्हा म्हणाले जर तू काहीच केलंस नाहीस तर तू वाचणार नाही. करो किंवा मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु त्यामुळे लोकांना असं वाटू लागलं की मी कोणाच्या तरी प्रेमात आहे किंवा चित्रपटासाठी असं केलं आहे. खरं सांगायचं झालं तर मी माझा जीव वाचवण्यासाठी हे सगळं करत होतो. ही माझ्या ट्रान्सफॉर्मेशन मागील खरी प्रेरणा होती. याशिवाय दुसरं कोणतीही कारण यामागे नव्हतं. इतकं वजन कमी करणं म्हणजे वाटतं तितकं सोप नाही.

"आपलं वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगताना अदनान म्हणाला, "माझ्या जवळच्या लोकांनीही माझ्याकडून अपेक्षा करणं सोडून दिली होती. पण मी त्यांना दोष देणार नाही. वजन कमी करण्याचं मोठं आव्हान माझ्यासमोर होतं. नशीबाने एका उत्तम न्यूट्रिशनिस्टच्या मदतीने मी वजन कमी केलं." असा खुलासा अदनान सामी यांनी केला. 

मागील बातमी
दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर
पुढील बातमी
देऊरचा अनिकेत शिंदे यूपीएससी परीक्षेत देशात १८ वा

संबंधित बातम्या