सातारा : अंगापूर तर्फ तारगाव येथून राहत्या घरातून १७ वर्षीय युवतीचे अपहरण झाले असल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मुस्तकिम नजीर शेख (वय २२ रा. अंगापूर तर्फ तारगाव, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून १७ वर्षीय युवतीचे कायदेशीर रखवालीतून पळून नेत अपहरण केलं असल्याचं फिर्यादीत नमूद आहे.