कराड : चाफळ (ता. पाटण) येथील चाफळहून पाटणकडे जाणार्या मार्गावर महाबळवाडी शेजारील घाटात गुजरवाडीनजीक दुचाकी व चारचाकी वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.
राहुल पवार (रा. सैदापूर, सातारा) हे जागीच ठार झाले असून ते कन्ट्रक्शन व्यावसायिक होते. सातारा छत्रपती शाहू स्टेडियम येथील एके स्वीमिंग पूलच्या व्यवस्थापिका नीलम पवार यांचे पती राहुल पवार हे रविवारी दुचाकीवरून चाफळ - पाटण मार्गावरून प्रवास करत होते. ते महाबळवाडीजवळील घाट मार्गावर गुजरवाडीनजीक आल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये धडक झाली. पाटणच्या शासकीय रूग्णालयातील शवविच्छेदनानंतर राहुल पवार यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.