सातारा : सातारा शहर परिसरात पोलिसांनी 8 जुगार अड्ड्यांवर छापे टाकले असून याप्रकरणी 8 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या कारवाईत 5 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, समीर साहेबलाल शेख (वय 34, रा. रविवार पेठ), मंगलदास शिवदास बाबर (वय 52, रा. सदरबझार), कैलास शंकर मोहिते (वय 48, रा.कामाठीपुरा), हर्षदराज शिवाजीराव कुमकर (वय 52, रा. शनिवार पेठ), शिवराज मानसिंग रजपूत (वय 35, रा.सदरबझार), अक्षय दिलीप माने (रा.धनगरवाडी), वैभव विश्वनाथ कोल्हे (वय 22, रा.प्रतापसिंहनगर), नदीम नासिर सय्यद (रा.बुधवार पेठ) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी या सर्व कारवाई लक्ष्मी टेकडी, झेडपी चौक परिसर, देगाव फाटा, रविवार पेठ, कोडोली, बॉम्बे रेस्टॉरंट या परिसरात केल्या आहेत.
दि. 30 डिसेंबर रोजी पोनि राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तयार करुन जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. सलग दोन दिवस जुगार अड्ड्यांवर छापे पडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत सुमारे 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.