सानुग्रह अनुदान योजनेच्या धनादेश व गटई स्टॉलचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात वितरण

by Team Satara Today | published on : 13 July 2026


सातारा : ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार उपलब्ध करुन देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेचे धनादेश व अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील नागरिकांना गटई कामगारांना गटई स्टॉलचे वाटप लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, खासदार नितीन पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार सर्वश्री धैर्यशील कदम, महेश शिंदे, डॉ. अतुल भोसले, सचिन पाटील, मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्याधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव आदी उपस्थित होते.

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सातारा जिल्हयातील   एकूण 131 लाभार्थी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैंकी महामंडळाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार 15 पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात संबंधित महामंडळाकडून मंजूर करण्यात आलेली सानुग्रह अनुदानाची रक्क्म ऑनलाईनद्वारे थेट जमा करण्यात आले आहे.  तसेच अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी  लाभार्थ्यांना पत्र्याचे गटई स्टॉल व स्टॉलवर प्रती लाभार्थी कमाल र.रु.5,000/- अनुदान DBT द्वारे वितरीत करण्यात येते.  


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाटण तालुक्यातील ९ गावांतील ५५८ घरकुलांचे पुनर्वसन डिसेंबर अखेर पूर्ण करा - पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून सहा कोटी रुपयांचा निधी - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, तरडगाव, लोणंद पालखी तळ, नीरा दत्तघाट व पालखी मार्गाची पाहणी

संबंधित बातम्या