सातारा : भारतात दरवर्षीत अडीच लाख मृत्यू कावीळीमुळे होतात म्हणजे तिस सेकंदात एक मृत्यू होत आहे. कावीळ हा गंभीर आजार असून प्रत्येक व्यक्तीने कावीळीची तपासणी करून घेणे व लसीकरण करुन घेणे गरजेचे असून कावीळीचा संसर्ग रोखण्याकरीता समाजाचा सहभागही महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले.
जागतिक कावीळ दिन २८ जुलै रोजी पाळला जातो या निमित्ताने स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. करपे बोलत होते.
कार्यक्रमास छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठता डॉ. भारती दासवाणी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कदम, डॉ. सुनिल चव्हाण, डॉ. निलेश कुचेकर, हेमंत भोसले यांच्यासह छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते
कावीळ नियंत्रण सप्ताहानिमित्त आरोग्य कर्मचा-यांचे कावीळ लसीकरण, जिल्हा कारागृह बंदयांची तपासणी, गरोदर मातांची तपासणी तसेच विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.