जागतिक योग दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी योग सोपान वर्ग

योगविद्या धाम सातारा संस्थेच्या वतीने आयोजन

by Team Satara Today | published on : 15 June 2025


सातारा : योगविद्या धाम सातारा संस्थेच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी खास ज्येष्ठ नागरिकांकरिता योग सोपान वर्ग घेण्यात येणार आहेत. हा वर्ग दि. 16 ते 27 जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. हा वर्ग संपूर्णपणे मोफत आहे.

सर्व ज्येष्ठ नागरिक, व्याधीग्रस्त नागरिक या शिबीराचा लाभ घेऊ शकतात. कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

श्री जय अपार्टमेंट जुना आरटीओ चौक, कूपर कॉलनी सांस्कृतिक हॉल सदरबझार, कांगा कॉलनी मेडिटेशन हॉल, हुतात्मा गार्डन, गजानन महाराज मंदिराशेजारी शाहुपुरी, स्नेहदीप हॉल, सोहनी गिरणी जवळ, अजिंक्य कॉलनी, शिवछत्रपती वाचनालयाशेजारी, पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघ कनिष्क हॉलसमोर, सुमित्रा राजे भवन समाज मंदीर शनिवार पेठ सातारा अशा सात ठिकाणी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुकांनी श्रीजय अपार्टमेंट, जुना आरटीओ चौक, सदरबझार येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा शैलजाताई ठोके यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी
पुढील बातमी
इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी

संबंधित बातम्या