सातारा शहर परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 01 April 2026


सातारा : शहर परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल चंदुलाल मुथा, विपुल चंदुलाल मुथा आणि १२ अनोळखी जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वनवासवाडी येथे दुकानातील सात कामगार फिर्यादी महिलेच्या कंपाऊंडच्या भिंतीची नासधुस करत होते. यावेळी स्वतःच्या कंपाउंड वॉलची भिंतीचा वापर न करता फिर्यादीच्या कंपाउंड वॉलच्या भिंतीवर लोखंडी पोल लावून पत्रे लावत होते. पत्रे का लावता असे विचारल्यावर फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून फिर्यादीच्या भावाला लाथा बुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद ४० वर्षीय महिलेने दिली असून १४ जणांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आहे घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
कुऱ्हाडीने हल्लाप्रकरणी मुळीकवाडीचा आरोपी दोषी; न्यायालयाची शिक्षा

संबंधित बातम्या