सातारा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही विकासकामांच्या निविदांची जाहिरात प्रसिध्द केल्याप्रकरणी दोन सरपंच, ग्रामसेविकेवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनापूरच्या ग्रामसेविका मनिषा हणमंत चव्हाण (रा. नागठाणे, ता. सातारा), सरपंच सुनंदा सर्जेराव खरात (रा. सोनापूर, ता. सातारा) तसेच निनाम, ता. सातारा येथील गावचे सरपंच सुभाष बाबुराव वायदंडे (रा. निनाम, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीत नमूद केले आहे की, सोनापूरचे ग्रामसेविका मनिषा चव्हाण, सरपंच सुनंदा खरात यांनी 15 व्या वित्त आयोगातील 2023-2024 मधील 5 विकासकामे तसेच निनाम, ता. सातारा येथील गावचे सरपंच सुभाष बाबुराव वायदंडे (रा. निनाम, ता. सातारा) व ग्रामसेविका चव्हाण यांनी सात विकास कामांच्या निविदा एकत्रितपणे एका दैनिकांत प्रसिध्द केल्या. यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आदर्श आचारसंहितेचा र्भग झाला आहे. तपास सहायक फौजदार शिंदे करत आहेत.