महामार्गावरील काशीळ येथे भरधाव ट्रक दुभाजकावर धडकला; ट्रकचे मोठे नुकसान, चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 July 2026


सातारा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील काशीळ येथे भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो दुभाजकावर धडकल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाल्याने चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधुरी गुप्ता (रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 28 जुलै रोजी मध्यरात्री नितीन रवींद्र कांबळे हा अशोक लेलंड कंपनीचा ट्रक (एमएच 11 डीडी 7763) सातार्‍याहून बेंगळुरूकडे घेऊन जात असताना काशीळ येथील अतिथी हॉटेलसमोर भरधाव वेगामुळे वाहनावरील ताबा सुटला.

ट्रक दुभाजकावर आदळून पुढील चाकाचा जॉइंट तुटला आणि वाहन गटारात घुसले. अपघातात ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार गवळी तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साहित्यरत्न, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त डॉ. शरद गायकवाड यांचे रविवारी व्याख्यान, संबोधी प्रतिष्ठानचे वतीने आयोजन
पुढील बातमी
सासपडे येथे केबल वायरच्या वादातून बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

संबंधित बातम्या