08:17pm | Sep 14, 2024 |
सातारा : राज्य शासनाने सर्वसामान्य रुग्णांना सर्वोत्तम व मोफत उपचार देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित केली आहे. जावली तालुक्यात ही योजना लागू असलेल्या एका हॉस्पिटलने रुग्णाला कल्पना न देता खाजगी उपचार देऊन त्याचे तीन लाख रुपये बिल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकारासंदर्भात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी हा प्रकार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या निदर्शनास आणून देत असे गैरप्रकार करणार्या हॉस्पिटल्स व संनियंत्रण आस्थापनांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
जावली तालुक्यातील रुग्ण अनिल जाधव यांच्या प्रकरणात हा प्रकार उघडकीस आला. संबंधित हॉस्पिटल योजनेत असून देखील त्याची माहिती रुग्णाला न देता त्याचे उपचार खासगी स्वरूपात करून 3 लाख रुपये पर्यंत बिल करण्यात आले. याची माहिती शिवसेना पदाधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ हॉस्पिटल गाठले. परंतु तेथील मॅनेमेंटने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. याची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. करपे तत्काळ या ठिकाणी पोहोचले व त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून हॉस्पिटल प्रशासनाच्या अधिकार्यांना खडे बोल सुनावले. त्यासोबत जिल्हाप्रमुख व सहकार्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकार्यांना धारेवर धरले.
हे गैरप्रकार थांबवले नाहीत तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला. हॉस्पिटल प्रशासनाने सामंज्यस्याची भूमिका करून रुग्णाचे सर्व बिल माफ केले. या प्रसंगी तालुका प्रमुख नितिन गोळे, सागर रायते, सुनील पवार, प्रणव सावंत, शिवराज टोणपे, रवींद्र भणगे, इम्रान बागवान, प्रशांत शेळके, हरी पवार, उमेश दुर्गावळे, रवी पार्टे, अमोल गोसावी, बापू गोळे, रुग्णाचे नातेवाईक, सौ. जाधव व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |