पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील सहायक प्रा. अश्विनी तानाजी कांबळे यांना पीएच. डी. पदवी

by Team Satara Today | published on : 12 December 2025


पुसेगाव  : पुसेगाव येथील, रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे सहायक प्रा. अश्विनी तानाजी कांबळे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी "इंडंटिफिकेशन ऑफ नीड फॉर स्मार्ट टुरिझम इन सदन महाराष्ट्र " या विषयावरील सखोल संशोधनासाठी पीएच. डी. पदवी बहाल केली आहे.

या संशोधनामध्ये त्यांनी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विषयी अभ्यास केला. या संशोधनासाठी प्रो.डॉ. नौशाद मुजावर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब, सचिव विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (ऑडिट) प्राचार्य डॉ राजेंद्र मोरे, डॉ. तानाजी कांबळे तसेच  शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर वाणिज्य अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. एस. महाजन यांनी प्रा. अश्विनी तानाजी कांबळे यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

याचप्रमाणे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर. पी.भोसले, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद,प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, डॉ.अनिल जगताप, प्रा. प्रदीप गायकवाड तसेच सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक, यांनी त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन  केले आहे.


 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इंडियन एअरफोर्समध्ये स्पर्धा परीक्षामधून निवडझाल्याबद्दल शंभूराज राजेघाटगे याचा सत्कार
पुढील बातमी
कोल्हापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय 'बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ

संबंधित बातम्या