उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ !

सातारा : सुंदर चित्रपटांची मेजवानी या २०२५ च्या स्वागतात सातारकर चित्रपट रसिकांसाठी 'अनुभव फिल्म क्लब' द्वारे करण्यात आली आहे.

मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्याचे काम दृकश्राव्य म्हणजेच चित्रपट माध्यमाद्वारे गत २७ वर्षे सातत्याने करणारी चित्रपट रसिकांची कलात्मक चळवळ म्हणजे 'अनुभव फिल्म क्लब' होय.

वर्षभर जागतिक दर्जाचे उत्तमोत्तम विदेशी चित्रपट दाखवतानाच मराठी चित्रपट सृष्टीतील काही नजरेतून सुटलेले वेगळेपण जपणारे चित्रपटांना रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे तसेच दिग्दर्शक कलावंतांचा रसिकांशी भेट घडवून आणण्यासाठी 'माय मराठी महोत्सव'  गुरुवार दि. २३ ते २६ दरम्यान 'सेवन स्टार चित्रपटगृह, सातारा' येथे दररोज सकाळी ९.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा सातारकर चित्रपट रसिकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी  दीपलक्ष्मी पतसंस्था, सातारा  अथवा राजभूषण सहस्रबुद्धे (९८२२२०६०२६) यांच्याशी संपर्क साधावा.

मागील बातमी
मराठी माणसांना मुंबईतुन विस्थापित करणारे दलाल कोण ?
पुढील बातमी
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही

संबंधित बातम्या