एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी या उपक्रमांतर्गत

एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

सातारा : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा व मिरॅकल फाऊंडेशन,इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने "एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी"  या उपक्रमांतर्गत बालगृहामधील बालकांना कौटुंबिक  वातावरण निर्माण करणे, कुटुंबाचे सक्षमीकरण करणे, बालगृहातील कर्मचारी व बालके यांचेसोबत कौटुंबिक जिव्हाळयाचे नाते निर्माण करणे या उद्देशाने  एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा हॉटेल ग्रीन फिल्ड, सातारा येथे संपन्न झाले. 

या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती एन.एन. बेदरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, मिरॅकल फाऊंडेशनचे  प्रोग्रॅम मॅनेजर संकेत शेगावकर,   बाल कल्याण समिती सदस्या शीतल लोखंडे यांच्यासह महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती एन.एन. बेदरकर म्हणाल्या, एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी  हा उद्देशच खुप विशिष्ठ व उल्लेखनीय आहे.  बालगृहामध्ये काळजी व संरक्षणासाठी  दाखल असलेल्या बालकांना बालगृहामध्येच कुटुंबाचे वातावरण निर्माण व्हावे  यासाठी  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा व मिरॅकल फाऊंडेशन, इंडीया हे एकत्रिपणे काम करीत आहेत या उल्लेखनिय कामकाजाबाबत त्यांचे अभिनंदन केले.

प्रशिक्षणामध्ये संपुर्ण दिवस बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल, केस मॅनेजमेंट, बालकांचे कुटुंबआधारीत पर्यायी संगोपन, कुटुंबाचे सक्षमीकरण या विषयांवर उपस्थित तालुकास्तरावरील अधिकारी/कर्मचारी यांना देण्यात येणार आहे.  सदर प्रशिक्षणामुळे  तालुकास्तरावरील  अधिकारी, कर्मचारी यांना प्रत्यक्ष काम करताना अत्यंत महत्वाची मदत होणार आहे त्यामुळे  काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांबाबत हिताचे निर्णय घेणे व त्यांचे पुर्नवसन करणेसाठी बाल कल्याण समितीस सोपे जाणार आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालक वंचित राहणार नाही, असे महिला व बाल विकास अधिकारी तावरे यांनी यावेळी सांगितले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सुजाता देशमुख, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, सातारा यांनी केली. तसेच सुत्रसंचालन अजय सपकाळ, संरक्षण अधिकारी यांनी केले.  

मागील बातमी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पहाणी
पुढील बातमी
सातारा कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

संबंधित बातम्या