सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चारजण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यमनगर, सातारा येथून 22 वर्षीय युवती घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
दुसर्या घटनेत, सातारा तालुक्यातील एका गावातील विवाहिता आपला मुलगा व मुलगी या दोघांसह आत्याकडे जाते, असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे सासरे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.