सातारा : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षण सेवकांची भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने गुरूवारी सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामाार्फत सुमारे ३५७ शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यासाठी सुमारे १० पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.
शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कागदपत्र तपासणीस प्रारंभ झाला. यावेळी शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, उपशिक्षणाधिकारी हणमंत यादव उपस्थित होते. पहिल्या दिवशी सुमारे २०० शिक्षकांना कागदपत्र तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यासाठी सुमारे १० पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.
सकाळपासूनच झेडपीत कागदपत्र तपासणीसाठी शिक्षण सेवक व त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. त्यामुळे झेडपी परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पथकामार्फत सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती. शुक्रवारी सुमारे १५७ जणांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी सांगितले.
शिक्षण सेवकांच्या भरतीच्या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी - शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांची माहिती
by Team Satara Today | published on : 04 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा