अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 19 June 2025


सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी मध्यरात्री क्षेत्र माहुली पुलावरून चालत असणाऱ्या नितीन सोपान वाणी रा. समर्थ कॉलनी, ता. जि. जळगाव यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात वाणी यांचा मृत्यू झाला असून अज्ञात वाहन चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ॲम्बुलन्स अपघातात एक ठार, दोन महिला जखमी

संबंधित बातम्या