दाट आणि काळ्याभोर केसांसाठी 'या' पद्धतीने करा आवळ्याचा वापर

by Team Satara Today | published on : 23 January 2025


केसांच्या घनदाट आणि लांबलचक वाढीसाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र तरीसुद्धा केसांची वाढ होत नाही. केसांच्या वाढीसाठी आहारात पोषक घटकांचे सेवन करणे आवश्यक आहे. आहारात विटामिन सी, फायबर, कॅल्शियम इत्यादी घटकांनी समृद्ध असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यासह केसांनासुद्धा अनेक फायदे होतील. थंडीच्या दिवसांमध्ये केस कोरडे आणि रुक्ष दिसू लागतात. केसांची कितीही काळजी घेतली तरीसुद्धा केसांवर हवी तशी चमक येत नाही. केसांच्या चमकदार आणि निरोगी वाढीसाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले केमिकल युक्त तेलांचा किंवा शॅम्पूचा वापर करतात. मात्र असे केल्यामुळे केसांची गुणवत्ता अधिक खराब होऊन जाते. केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केस तुटणे, केस गळणे, कोंडा होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. 

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध असतात. आवळ्याचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचेला अनेक फायदे होतात. आवळ्यांमध्ये विटामिन सी, इतर पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. आवळ्याचा वापर आरोग्य, केस आणि त्वचेसाठी केला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी आवळ्याचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने आवळ्याचा वापर केल्यास केसांची वाढ चांगली होईल.

दैनंदिन आहारात आवळ्याचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास आरोग्यासह त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतील. आवळ्याच्या वापरामुळे केस गळती थांबून नवीन केस येण्यास मदत होईल. यासाठी आवळ्याच्या रस तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. सर्वच ऋतूंमध्ये बाजारात आवळे उपलब्ध होतात. त्यामुळे विकत मिळणारा आवळ्याचा रस आणण्यापेक्षा तुम्ही घरी सोप्या पद्धतीमध्ये आवळ्याचा रस बनवू शकता.

आवळ्याचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, एक किंवा दोन आवळे स्वच्छ धुवून बारीक कापून घ्या. त्यानंतर कढीपत्त्याची पाने आणि आल्याचा बारीक तुकडा मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात थोडेसे पाणी टाकून बारीक वाटून घ्या. अशापद्धतीने तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये आवळ्याचा ज्युस बनवू शकता. यामुळे उपाशी पोटी किंवा इतर वेळी तुम्ही या पद्धतीने आवळ्याचा रस तयार करून सेवन करू शकता.

नेहमी नेहमी आवळ्याचा रस बनवणे शक्य होत नसल्यास तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी आवळ्याचा रस स्टोर करू शकता. यासाठी तयार केलेला आवळ्याचा रस बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमध्ये त्याचे आईस क्यूब तयार होते. सकाळी किंवा इतर वेळी आवळ्याचा रस पिण्याची इच्छा झाल्यास तुम्ही कोमट पाण्यात आवळ्याचे क्यूब टाकून पिऊ शकता.

त्वचा आणि केसांना होणारे फायदे:

आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास केसांसह त्वचेलासुद्धा अनेक फायदे होतील. त्वचेवर आलेले मुरूम, पिंपल्स, पिगमेंटेशन घालवण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या रसाचे सेवन करू शकता. आवळ्याचा रस प्यायल्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते आणि केसांना अनेक फायदे होतात. शरीरातील हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात आवळ्याच्या रसाचे सेवन करावे.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कॉमेडियन कपिल शर्माला पाकिस्तानातून ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी
पुढील बातमी
न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रचला इतिहास

संबंधित बातम्या