'मिशन करिअर' राष्ट्रीय पातळीवर युवकांसाठी मार्गदर्शक

राज्यपाल राजेंद्रजी आर्लेकर यांचे उद्गार

by Team Satara Today | published on : 09 March 2026


कराड : 'मिशन करिअर' या पुस्तकाद्वारे डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी आजच्या युवापिढीला आनंददायी व यशस्वी जीवनाचा कानमंत्र दिला असून त्यांचे हे इंग्रजी पुस्तक राष्ट्रीय पातळीवर युवकांसाठी निश्चित मार्गदर्शक ठरेल असे उद्गार केरळचे राज्यपाल राजेंद्रजी आर्लेकर यांनी काढले.

पुणे येथील लोकभवनमध्ये राज्यपाल राजेंद्रजी आर्लेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व लेखक डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी लिहिलेल्या व प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या 'मिशन करिअर' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी पत्रकार गजानन चेणगे, ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, पुणे येथील भारतीय शिक्षण संस्थेचे महासंचालक प्रा. डॉ. प्रकाश साळवी, सामाजिक कार्यकर्ते विजय उत्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुनावळे ते वासोटा असा रोपवे तयार करण्यासाठी आर्थिक तरतूद; रोपवेमुळे पर्यटकांना काही मिनिटांत वासोटा किल्ल्यावर पोहोचता येणार

संबंधित बातम्या