लक्ष्मी टेकडी येथे जुगार अड्ड्यावर छापा; रोख रक्कम जप्त

by Team Satara Today | published on : 11 June 2026


सातारा : सातारा शहर पोलिसांनी लक्ष्मी टेकडी परिसरातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाण्याच्या टाकीशेजारी असलेल्या बंद टपरीच्या आडोशाला जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 450 रुपयांची रोकड आणि जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य ताब्यात घेतले. याप्रकरणी मंगलदास शिवदास बाबर (रा. लक्ष्मी टेकडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काशीळमध्ये रात्रीच्या वेळी चेहरा झाकून फिरणार्‍या तरुणावर कारवाई
पुढील बातमी
य.मो. कृष्‍णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी सहकार आणि संस्थापक पॅनेलना चिन्हांचे वाटप; २१ जून रोजी मतदान, २३ जून रोजी मतमोजणी

संबंधित बातम्या