04:38pm | Sep 14, 2024 |
केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली आहे. आता देशातील 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले कोणीही आयुष्मान कार्ड बनवू शकणार आहे. त्यासाठी उत्पन्नाची अट नाही. आयुष्यमान कार्डमध्ये पाच लाखांपर्यंतचा विमा दिला जात आहे. कोणत्याही रुग्णालयात पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहे.
34.7 कोटी लोकांना आयुष्मान कार्ड :
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी वृद्धांना कोणत्याही कार्यालयात जावे लागणार नाही. फक्त त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे. ही कागदपत्रे असताना मोबाईल ॲपद्वारेच कार्ड बनवले जाणार आहे. याबाबतचा आदेशही सरकार आठवडाभरात काढणार आहे. वृद्ध लोकांनी हे आयुष्यमान कार्ड बनवल्यानंतर त्यांना अनेक गंभीर आजारांवर रुग्णालयात मोफत उपचार करता येणार आहेत. 30 जून 2024 पर्यंत देशातील 34.7 कोटी लोकांना आयुष्मान कार्ड मिळाले आहे.
अशा व्यक्तीसाठी नवीन कार्ड :
केंद्र सरकारने म्हटले आहे की, जर कुटुंबातील कोणताही सदस्य आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या कुटुंबात एक वृद्ध व्यक्ती असेल तर आता त्या वृद्ध व्यक्तीचे नवीन कार्ड वेगळे केले जाईल. त्यासाठी नोंदणीही नव्याने करावी लागणार आहे. कार्ड बनवल्यानंतर वृद्धांना कोणत्याही रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येणार आहेत.
या लोकांनाही असणार पर्याय :
केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ घेणारे 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृद्ध देखील आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड बनवण्याचा पर्याय निवडू शकतात, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. जर एखाद्याचे वय 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि त्याचा खाजगी आरोग्य विमा असेल तर तो या योजनेअंतर्गत नोंदणी करू शकतो.
टोल फ्री क्रमांक 14555 वर करता येणार कॉल :
आयुष्मान कार्डशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 14555 वर कॉल करू शकता. हे कार्ड बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. कोणत्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे त्याची सर्व माहिती मिळेल. सध्या दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आयुष्मान योजना नाही. या राज्य सरकारांनी ही योजना लागू केलेली नाही.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |