नोकरी, उद्योगासाठी पुण्या-मुंबईची गरज नाही : आ. महेश शिंदे

by Team Satara Today | published on : 15 October 2025


वडूज : खटाव तालुक्यातील कातळगेवाडी गावाने आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीपासून आमदारकीपर्यंत नेहमीच मोलाची साथ दिली आहे. आपण आमदार केले म्हणूनच मी या भागाचा विकास केला पाणी आणले. आता नोकरी, उद्योगासाठी पुण्या-मुंबईला जाणारी पोरं तयार करू नका. तर गावात राहूनच आई-वडिलांची सेवा करत मुंबईच्या हजारपटीने कमवतील अशी पिढी तयार करण्याची ताकद आपल्यात आहे. मागील काळ नाकर्तेपणाचा होता आपल्याला पर्याय नव्हता आता आहे, असे मत कोरेगाव खटावचे आ. महेशदादा शिंदे यांनी व्यक्त केले. 

कातळगेवाडी येथे ग्रामस्थांच्यावतीने आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वडूज बाजार समितीचे माजी सभापती आण्णासाहेब वलेकर, सांगली बँकेचे चेअरमन चंद्रकांत जाधव, दयानंद भारती, महादेव जाधव, सरपंच जगन्नाथ सावंत, उपसरपंच भरत मोरे, ग्रामपंचायत सदस्या रंजना जाधव, सत्वशिला जाधव, ज्ञानेश्वर जाधव, गोपीचंद जाधव, राजुशेठ पन्हाळे, चंद्रकांत खुस्पे, शिवाजी सुर्यवंशी, मनोहर जाधव, बबन जाधव, अशोक केंजळे, तानाजी जगदाळे उपस्थित होते.

आ. महेश शिंदे म्हणाले, आपण मागील 5 वर्षात मतदार संघात बरीच विकास कामे केली. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. उर्वरीत राहिलेल्या विकास कामावर लक्ष केंद्रित केले असून सैदैव मी मतदार संघातच असतो. लागेल तेवढा निधी आणून आपला मतदारसंघ सुजलाम सुफलाम बघण्यासारखा करणार आहे. पुढील काळात पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले.

महादेव जाधव म्हणाले, आमदारसाहेब पाणी प्रश्नाबरोबर मराठी शाळेचा प्रश्न, रस्ते, बंदिस्त गटार असे प्रश्न तुम्ही सोडवले परंतू गाव परिसरातील विकासाला तुम्ही ताकद द्यावी. तर तसेच जिहे-कठापूर अंतर्गत स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार उपसासिंचन योजना लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी म्हणजे या भागाचा शेती पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपेल. गाव तुमच्या पाठीशी पूर्णपणे उभा राहिल, अशी ग्वाही दिली. यावेळी दयानंद भारती यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक, सूत्रसंचालन महादेव जाधव यांनी केले. आभार गोपीचंद जाधव यांनी मानले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी शिबीर संपन्न
पुढील बातमी
तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले, ओळख पटवा व घेऊन जा

संबंधित बातम्या