जिल्ह्यातील डेंग्यू बाधितांची संख्या १०३ वर; हिवतापाचे ३७ रुग्ण; वातावरणात वारंवार बदल होत असल्याने साथरोगांत वाढ

by Team Satara Today | published on : 06 August 2026


सातारा : जिल्ह्यात वातावरणात वारंवार बदल होत असल्याने साथरोगांत वाढ झाली आहे. थंडी, ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा व्याधींनी चिमुरड्यांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश रुग्णांमध्ये डेंग्यू व हिवतापसदृश लक्षणे आढळून आल्याने आरोग्य विभाग व हिवताप विभागाकडून गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. डेंग्यू अळ्या नष्ट करण्याबरोबरच संशयित नागरिकांचे मलेरिया चाचणीसाठी रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले. अनेकांना जिल्हा रुग्णालयात डेंग्यू चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला.

जिल्ह्यातील डेंग्यू बाधितांची संख्या १०३ वर पोहोचली आहे. तसेच हिवतापाचे ३७ रुग्ण झाले आहेत. यात सातारा तालुक्यात हिवतापाचे ६ तर डेंग्यूचे २१ रुग्ण आढळले आहेत. कोरेगाव तालुक्यात हिवतापाचे ४ तर डेंग्यूचे ११ रुग्ण आढळलेत. वाई तालुक्यात हिवतापाचे १ तर डेंग्यूचे ६ रुग्ण आढळले आहेत. महाबळेश्वर तालुक्यात डेंग्यूचे ३ रुग्ण आढळले आहेत. जावली तालुक्यात हिवतापाचे ५ तर डेंग्यूचे १२ रुग्ण आढळले आहेत.

खंडाळा तालुक्यात डेंग्यूचे २ रुग्ण आढळले आहेत. कराड तालुक्यात हिवतापाचे ६ तर डेंग्यूचे १४ रुग्ण आढळले आहेत. पाटण तालुक्यात हिवतापाचे ९ तर डेंग्यूचे ७ रुग्ण आढळले आहेत. फलटण तालुक्यात हिवतापाचे १ तर डेंग्यूचे १० रुग्ण आढळले आहेत. माण तालुक्यात हिवतापाचे १ तर डेंग्यूचे २ रुग्ण आढळले आहेत.

खटाव तालुक्यात हिवतापाचे २ तर डेंग्यूचे ७ रुग्ण आढळले आहेत. यात ग्रामीण भागात हिवतापाचे २५ व सातारा शहरात २ असे ३७ रुग्ण असून डेंग्यूचे ग्रामीण भागात ९५ तर सातारा शहरात ८ असे एकूण १०३ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू, हिवतापाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्ह्याचा आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, सर्व आरोग्य केंद्रांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व्हेक्षण करून रक्ताचे नमुने घेतले जात आहे. बाधितांवर शासकीय रूग्णालयात उपचार केले जात आहे. काही नागरिक खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
८ ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीर; ५ हजार बाटल्या रक्त संकलनाचा मानस
पुढील बातमी
कराडमधील नामांकित हॉटेलसह सहा हॉटेलवर अन्न-औषध प्रशासनाचे छापे, हॉटेलच्या नावाबाबत गुप्तता

संबंधित बातम्या