सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरळे येथील तिघांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 15 April 2026


सातारा :  आरळे (ता. सातारा) येथील तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारातालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संजय कदम, सुरज आनंदराव वाघमळे, पियुष कदम (रा. आरळे, ता. सातारा) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांची माहिती अशी, रविवारी (दि. १२) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आरळे येथील वडजाई मंदिराजवळ विनापरवाना मोठमोठ्या आवाजात डॉल्बी सुरु असल्याचा कॉल डायल ११२ ला आला होता. त्यावरुन पोलिस त्याठिकाणी गेले असता वरील तिघा संशयीतांनी सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे पोलिसांनी वरील तिघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पो. कॉ. संदीप पांडव यांनी याबाबत सातारा तालुका पोलिसांत तक्रार दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात यशवंत उद्यानात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात; फुले-शाहू-आंबेडकर साहित्य सदनाचे लोकार्पण
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या