कोयना धरणाचे 10 दिवसांनी वक्र दरवाजे बंद

by Team Satara Today | published on : 25 July 2025


पाटण : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणार्‍या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ पायथा वीजगृृहातून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळेच सातारा व सांगली जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. 

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी 15 जुलैला सकाळी 11 वाजता सहा वक्र दरवाजे प्रथम उघडले होते. त्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरूच होता. बुधवारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला असला तरी धरणात येणारे पाणी लक्षात घेत गुरूवारी दुपारी धरणाचे सर्व सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. 

धरणात गुरूवारी सायंकाळी प्रतिसेकंद 19 हजार 974 क्युसेक पाण्याची आवक होत होती. धरणात सध्या 77.40 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयनानगर येथे 2 हजार 576 मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे 2 हजार 687 मिलिमीटर तर महाबळेश्वरमध्ये 2 हजार 682 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मकरंद पाटील यांच्याकडे कृषी मंत्रिपद?
पुढील बातमी
मुलीचे प्राण वाचवणाऱ्या युवकांचे कौतुक करावे तेवढे कमी

संबंधित बातम्या