08:03pm | Dec 20, 2024 |
सातारा : नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करता येणार नाही, असा आदेश दिलेला आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टर व इतरांवर खुनाचा गुन्हा लागूच आहे. याप्रकरणी पोलिसांनी योग्य दोषारोपपत्र न्यायालयात सादर करून संबंधितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मीरा-भाईंदरचे माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांनी केली आहे.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले, फेब्रुवारी 2023 मध्ये सातारा तालुक्यातील नागठाणे येथील एका घाडगे रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी आली होती. त्यावेळी त्याठिकाणी संबंधित डॉक्टर उपस्थित नव्हते. मात्र, डॉक्टरांनी फोनवरुन सांगून ही प्रसूती कम्पाउंडरने केली. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांची चूक आणि निष्काळजीपणा यामुळेच हा प्रकार घडला. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
गुन्हा नोंद झाल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याचे तेलतुंबडे यांनी न्यायालयात आरोपींना जामीन मिळावा, यासाठी मदतच केली. त्यामुळे आम्ही पोलीस अधीक्षक आणि उच्च न्यायालयात याबाबत दाद मागितली. त्यामुळे तेलतुंबडे यांच्या जागेवर तपासी अधिकारी म्हणून सातारा तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची नियुक्ती करण्यात आली. याचदरम्यान उच्च न्यायालयानेही आरोपींवर खुनाचा गुन्हा का लागू केला नाही, असे म्हटले. त्यामुळे याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद झाला होता.
उच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे संशयितांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन याला स्थगिती मिळवली. त्याचाही निकाल लागला असून, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करता येणार नाही, असा आदेश दिलेला आहे. यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे. आम्ही न्यायालयीन लढाई जिंकली आहे. आता मुख्य लढाई ही पोलिसांच्या हातात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन न्यायालयात योग्य दोषारोप पत्र सादर करावे, तसेच डॉ. घाडगेंवर निलंबनाची कारवाई करावी. जेणेकरुन न्यायालयीन निकाल लागेपर्यंत अशी दुर्दैवी घटना त्यांच्याकडून घडणार नाही. अन्यथा आम्ही पुन्हा न्यायालयात जाणार आहोत, असा इशारा सोमनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |

'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |