सातारा : मुळीकवाडी(पो. तासगाव ता. सातारा) येथील 36 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सचिन धोंडीबा सावंत असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार दि. 16 रोजी रात्री 9 वाजण्यापूर्वी सचिन सावंत याने लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून गळफास घेतला. ही बाब हणमंत सावंत यांना कळताच त्यांनी सातारा तालुका पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता तो मयत झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करत आहेत.
लग्न ठरत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या
by Team Satara Today | published on : 17 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026