कराड : कराड येथील वाढीव भागातील बर्गे मळा येथे नागरीकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे निवेदन राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन देऊन करण्यात आली होती. याची तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी तातडीने दखल घेऊन बर्गे मळा येथे नागरीकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची बाब लक्षात घेता त्या परिसराला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पालिकेचे सर्व विभागांचे अधिकारी यांना सोबत घेऊन व राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला व त्यांचे पदाधिकारी यांच्या समवेत पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून या बाबत ची माहिती घेऊन नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन देऊन आपल्या मागण्यांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी दिले. या बद्दल राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या वतीने कराड तालुका मार्गदर्शक राकेश पवार यांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर साहेब यांचे आभार मानले.