जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे

by Team Satara Today | published on : 04 December 2024


सातारा : युवा कार्यकर्त्यांचे प्रभावी संघटन कौशल्य, शेतकरी व महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन, मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन, तसेच सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आ. मनोज घोरपडे यांनी केलेले कार्य डोळ्यांसमोर ठेवून जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले आहे, असे मत प्रा. दशरथ सगरे यांनी व्यक्त केले.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रचंड मताधिक्य मिळवून विजयी झाल्याबद्दल आ. मनोज घोरपडे यांचा यशोदा इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संजय मोरे, संजय शेलार, रणजित घाडगे, दिलीप पवार, विशाल पवार, राजेंद्र यादव, महेश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रा. दशरथ सगरे म्हणाले, लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघातील समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक प्रशासन, राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करणे गरजेचे असते. आपल्या भागातील विविध विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याची धमक नवनिर्वाचित आ. मनोज घोरपडे यांच्या अंगी असल्याचे मत प्रा. सगरे यांनी व्यक्त केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन
पुढील बातमी
शरीरात हिमोग्लोबिन जास्त झाल्यास होऊ शकतात आजार

संबंधित बातम्या