सातारा : गळफास घेवून एका युवकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दरे खुर्द, ता.सातारा गावच्या हद्दीत करंजाच्या झाडाला शुभम बबन साळुंखे वय 23, रा. गडकरआळी, सातारा या युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. 3 डिसेंबर रोजी समोर आली. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.