हार्ट अटॅक वा कार्डिएक अरेस्टच्या केस वाढत आहेत. कोणी नृत्य करताना अचानक कोसळत आहे. तर कोणी एक्सरसाईज करताना अचानक जग सोडून जातोय. हदयाची गती अचानक थांबल्याने असे मृत्यू होत आहेत. एका क्षणात व्यक्तीचा मृत्यू होत आहे. या लाईफ थ्रेटपासून धोका असला तरी काही तातडीचे उपचार केले तर जीव वाचू शकतो. जर हृदय विकाराचा झटका आला असेल तर वेळीच सीपीआर ( कार्डियो पल्मोनरी रिससिटेशन ) दिला तर श्वास पुन्हा येऊ शकतो. अखेर हा सीपीआर काय असतो आणि तो हृदयाची गती कशी पुन्हा चालू करतो? चला सीपीआर बद्दल जाणून घेऊयात….
पुन्हा हृदय चालू होऊ शकते
हार्ट डिसिजची रिस्क वेगाने वाढत आहे. अनेक लोकांना हृदय विकाराचा त्रास होत असतो. अनेक केसमध्ये अचानक हृदयाची गती थांबते. हार्ट अटॅक वा कार्डिएक अरेस्ट असे याला नाव दिले जाते. या स्थितीत दहा मिनिटांच्या आत जर कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन म्हणजे सीपीआर दिला तर ५० टक्के लोकांमध्ये रुग्णालयात न जाताही प्राण वाचवता येतात. हेल्थ तज्ज्ञांच्या मते हार्ट अटॅक वा कार्डिएक अरेस्ट येताच एकदम व्यक्तीचा मृत्यू होत नाही. त्यासाठी थोडा वेळ लागतो. या दरम्यान लागलीच सीपीआर देऊन हार्टला एक्टीव्ह करता येते. यामुळे मेंदू वा शरीराच्या अन्य भागात ऑक्सीजन पोहचण्यास मदत होते. अशा प्रयत्नामुळे हृदय पुन्हा श्वास घेऊ शकते.
सीपीआर केव्हा द्यावा ?
जर कोणा व्यक्तीचा बेशुद्ध होताच श्वास बंद पडत असेल तर समजून तर त्याला कार्डिएक अरेस्ट वा हार्ट अटॅक आला आहे. अशा वेळी या रुग्णाचा हाताच्या मनगटाची किंवा मानेची नस दाबून पाहावी. जर नाडी लागत नसेल तर हृदयाचा झटका आल्याचे समजून जावे. जर हात आणि पायात काहीच हालचाल जाणवत नसेल हा हार्ट अटॅकचा संकेत मानावा.
सीपीआर देण्याची सोपी पद्धत
रुग्णाला तात्काळ कोणत्याही सपाट जागेवर पाठीवर झोपवावे
आता आपल्या एका हातावर दुसरा हात ठेवावा, दोन्ही हातांना रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी ठेवावे. कोपरांना एकदम सरळ ठेवावे.
हातांवर जोर देऊन जोराने दाबावे,असे एका मिनिटांत किमान शंभर वेळा करण्याचा प्रयत्न करावा
३० वेळा छातीला दाबल्यानंतर दोन वेळा तोंडाने तोंडात श्वास द्यावा. यास ‘माऊथ टु माऊथ रेस्पिरेशन’ म्हणतात
हाताने छातीला एक ते दोन इंच दाबल्यानंतर सामान्य स्थिती येऊ द्यावी. असे तोपर्यंत करावे जोपर्यंत रुग्णाचे श्वास परत येत नाहीत वा तो मेडिकल इमर्जन्सीपर्यंत येऊ न देता हे करावे. अशा प्रकारे वेगाने पम्पिंग केल्याने हृदयात ब्लड फ्लो येतो आणि कार्डिक अरेस्टवाला मनुष्याचे प्राण वाचतात.